थापेवाडी खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा
पुणे:
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना २०१९ मध्ये पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथे घडली होती.कर्ज बाजारी झाल्याने चक्क स्वतच्या कारमध्ये दुसऱ्या व्यक्तीला जिवंत पेटवून देऊन स्वताच्या मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला होता. जवळ पास महिन्यांहून अधिक काळ या घटनेचा तपास सुरू होता. त्यानंतर पोलिसांना हा बनाव असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी खर्या आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. त्या आरोपीला आज शिवाजीनगर न्यायालयाने जनमाठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने थापेवाडी प्रकरण पुन्हा एकदा जागे झाल्यासारखे वाटते.
विठ्ठल चव्हाण असे जनमठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर नायायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक. माहिती अशी की, बारामती तालुक्यात राहणारा विठ्ठल चव्हाण हा व्यक्ती कर्जबाजारी झाला होता. या कर्ज बाजारी पणाला तो कंटाळला होता. त्याची विनायक उर्फ पिंटू ताराचंद या व्यक्तीशी ओळख झाली. ताराचंद याला दारूचे व्यसन होते. याच गोष्टीचा फायदा घेत विठ्ठल चव्हाण याने त्याला अनेकदा दारू पाजत असतं. एका दिवशी त्याला दारू पाजून पुरंदर तालुक्यातील थापेवाडी याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत स्वतच्या गाडीत आणले. त्यानंतर त्याचे कपडे स्वतः घातले आणि स्वतःचे कपडे त्याला घातले. आणि स्वतःच्या कारसह त्याला पेटवून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यावेळी पोलिसांनी घटनेचा जवळपास सखोल तपास केला. शेवटी पोलिसांच्या हा काही तरी बनाव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. आपल्यावरील कर्ज कुणी मागू नये, आपल्याला त्रास होऊ नये या उद्देशाने चव्हाण याने हा प्रकार केला. आज तीन वर्षानंतर त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन. लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.