खेड - शिवापूर नाक्यावर पोलिसांनी पकडलं ८किलो गांजा
भोर दि.१६
पुणे सातारा महामार्गावरील खेड - शिवापूर टोलनाक्यावर संशयित कार थांबवून पोलिसांनी ८ किलो गांजा पकडलाय. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून, ८ किलो गांजा आणि वाहतूकीसाठी वापरलेली कार, असा एकूण ४ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खेडशिवापूरच्या राजगड पोलिसांनी ही कारवाई केलीय.
खेड शिवापुर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी संशयत कार थांबवून गांजा पकडला असून कारमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेड शिवापुर टोलनाका येथील पुणे बाजूकडून येणारी भरधाव एच आर ५१ बि. सी. २४२४ क्रमांकाची कार सातारा बाजूकडे जात असताना राजगड पोलिसांचे वाहतूक विभाग नियत्रंणचे पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्होवाळ, अमोल सूर्यवंशी, होमगार्ड पंकज शिंदे यांनी संशयित कार थांबविली. कारची तपासणी केली असता मागील डिकीत गांजा आढळला. यातील १) ईस्माईल बाबु सय्यद, वय ३० वर्षे, रा. कनगल्ला, ता. बसवसर्कल जवळ, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, २) सैफाली शब्बीर सुतार, वय २३ वर्षे, रा. निपानी, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ३) जैनुल गजबार मुल्ला, वय ३५ वर्षे, रा. सोलापूर दर्गा गल्ली, ता.हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ४) जिआउल रेहमान रियाज मुजावर, वय २० वर्षे, रा. हरणापूरगड, ता.हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ५) आजु अजगर अल्ली खान, वय २१ वर्षे, रा. माणखुर्द, मुंबई या पाच आरोपींना पकडले आहे.
खेड शिवापूर टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. गांजा पडकलेली कार आणि आरोपींना घेऊन खेडशिवापूर चौकीत आणण्यात आलय.पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हे आरोपीची कसून चौकशी करत आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की नाकाबंदी करीत असताना प्राप्त माहीतीतील वर्णनाची हुंडाई वेरना गाडी नं. एच. आर 51 बी.सी. 2424 ही जवळ आलेनंतर थांबवून तीला बाजुस घेवून सदर गाडीमधील इसमाकडे चौकशी केली असता चालक याचेकडे चौकशी करीता त्याचेकडील गाडीची पाहणी केली असता मागील डीग्गी उघडून त्यामध्ये पाहणी करीत असताना एक काळे रंगाचे ट्रॅव्हलींग बॅगेमध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ ( 81,970 /- रू. किमंतीचे व वर्णनाचे गांजा प्लॅस्टीकच्या पिशवीसह एकुण वजन 8197 ग्रॅम (8 किलो 197 ग्रॅम) सदर गाडीतुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला आहे. तसेच हुंडाई वेरना गाडी नं. एच. आर 51 बी.सी. 2424 हिची अंदाजे किमंत 4,00,000/- रूपये अशी एकुण 4,81,970 /- रू. किमंतीचा अमली पदार्थ आणि गाडीसह त्यांना हस्तगत करण्यात आली आहे.आजच्या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. सदर कारवाईचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.