अमरावती: माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! अशी गर्भित धमकी देत एका अल्पवयीन मुलीचा कॉलेज ते घरापर्यंत पाठलाग करण्यात आला. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रणय हिरालाल वानखडे (२४, भुगाव) याच्याविरूध्द विनयभंग, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.
भाऊ, आईवडिलांना मारण्याची धमकी
मुलीने प्रणयच्या त्रासाबद्दल
सांगताच तिच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आपली मुलगी तुझ्यासोबत
बोलायला तयार नाही, तू तिचा पाठलाग करु नकोस, असे त्यांनी बजावले. त्यानंतर सुध्दा आरोपी त्या मुलीच्या
घराच्या आजुबाजुला फिरत असतो. २९ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी
मुलीच्या गावात पोहोचला. तिला, माझ्यासोबत बोल नाहीतर तुझे
माझ्यासोबत लफडे आहे, अशी बदनामी करेन, तसेच तुझा भाउ व आई वडिल यांना जीवाने मारुन टाकील अशी धमकी
दिली. त्यामुळे तिच्या वडिलांनी शनिवारी सायंकाळी पथ्रोट पोलीस ठाणे गाठले.