मुंबई: तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. SBI ग्राहकांना नव्या वर्षाआधी बँकेनं चांगलाच दणका दिला आहे.
आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. SBI ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे.
याचं कारण म्हणजे ज्यांनी SBI चं लोन घेतलं आहे त्यांना आता व्याजदर जास्त भरावं लागणार आहे. SBI ने आपल्या MCLR च्या दरात 25 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे.
त्यामुळे लोनवरील व्याजदर महाग झालं आहे. त्यामुळे बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना
धक्का बसला आहे. यानंतर बँकेकडून घेतलेली सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.
ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतलं आहे, त्यांनाही अधिक व्याज द्यावं लागणार आहे.
आता जुन्या आणि नव्या दोन्ही ग्राहकांवर
याचा परिणाम होणार आहे. RBI ने 7 डिसेंबर रोजी 0.35
टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली आहे.
त्यानंतर बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. SBI ने 25 बेसिस पॉईंटने व्याजदर वाढवले आहेत.
SBI चा रेपो रेट वाढून 6.25%
झाला आहे. मे महिन्यापासून
आरबीआयने रेपो दरात 2. 25 टक्के वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एक ते तीन महिन्यांचा एमसीएलआर 7.75% वरून 8% करण्यात आला आहे.
सहा महिने ते एक वर्षाचा एमसीएलआर 8.05% वरून 8.30% पर्यंत वाढवण्यात
आला. दोन वर्षांचा एमसीएलआर 8.25%
वरून 8.50% पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, तीन वर्षांचा
एमसीएलआर 8.35% वरून 8.60% पर्यंत करण्यात आला आहे.