मुंबई : पश्चिम उपनगरातील खार येथे एका 17 वर्षीय मुलाने आपल्या वयाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिच्यासोबत संबंध ठेवले. शरीर संबंध ठेवल्याचा व्हिडीओही तिच्या नकळत रेकॉर्ड केला आणि नंतर या मुलीला ब्लॅकमेल केलं.
आरोपी आणि
पीडिता दोघेही अल्पवयीन असल्यानं बाल लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा
नोंदवून घेत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी आधी मुलीची वैद्यकीय चाचणी
केली. त्यानंतर आरोपीची चौकशी करुन त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.
पोलिसांनी
आरोपीचा मोबाईल फोनही ताब्यात घेतला आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधूनच आरोपीने
मुलीसोबत संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनवला होता. या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना काही
अश्लील फोटोही आढळून आले आहेत. त्यातील काही फोटो हे पीडितेचे असल्याचं दिसून
आलंय.
धक्कादायक
बाब म्हणजे आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या शेजारीच राहतात. दोघांचेही कुटुंबीय
एकमेकांच्या परिचयाचे असून त्या दोघांना एकत्र पाहून कुणीच आक्षेप नोंदवला नव्हता.
समवयस्क असल्याने कुणालाही या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती. पण पडद्यामागे 17 वर्षीय मुलाचा वेगळाच प्रकार सुरु होता.
17 वर्षीय
मुलीने शेजारी राहणाऱ्या या मुलीला आधी आपल्या जाळ्यात ओढून नंतर तिच्यासोबत
गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीच्या ब्लॅकमैलिंगमध्ये त्रस्त होऊन
अखेर पीडितेनं आपल्या आईला सगळा प्रकार पहिल्यांदा सांगितला. तेव्हा ही घटना
उघडकीस आली.
पीडितेच्या
पालकांनी अखेर पोलिसांत याबाबत कळवलं आणि तक्रार नोंदवली. दरम्यान, मुलीच्या वैद्यकीय चाचणीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली. आता खार
पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे.