Type Here to Get Search Results !

Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार परतणार?

 


मुंबई: दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा हेरा फेरी (Hera Pheri) हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून त्याची ओळख आहे.

हेरा फेरी या चित्रपटाचा प्रथम भाग 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय कुमार ,सुनील शेट्टी आणि परेश रावल  यांची मनोरंजनाचे बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली होती. तर या फ्रेंचाईजीचा दुसरा चित्रपट 'हेरा फेरी 2' 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

तर, काही दिवसांपासून हेरा फेरी 3 हा चित्रपट चर्चेत आला आहे. हेरा फेरी 3 या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांना घेऊन चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार या चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे सोशल मीडियावर एक खळबळ उडाली होती. सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी कार्तिक आर्यनच्या या चित्रपटातील भूमिकेची पुष्टी केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते.

हेरा फेरी या चित्रपटाचा तिसरा भाग अक्षय कुमार शिवाय होऊ शकत नाही, असे देखील चाहत्यांकडून म्हणण्यात आले होते. यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. दरम्यान, फिरोज नाडीयालवाला यांनी हेरा फेरी फ्रेंचाईजीमध्ये राजू म्हणजेच अक्षय कुमारला पुन्हा बोलवण्याची मागणी सुरू केली आहे, असे पिकंव्हीला यांनी एका वृत्तामध्ये म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यच्या कास्टिंगबाबत तयारी सुरू झाली होती, पण आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहे.

फिरोज गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारला भेटून सर्व मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करत असून, अक्षयला हेरा फेरी फ्रेंचाईजीमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण चाहत्यांच्या मते, हेरा फेरी फ्रेंचायसीमधील राजू हे पात्र फक्त अक्षय कुमारच चांगल्या प्रकारे निभावू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या चित्रपटानंतर अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हेरा फेरी 3 मध्ये परत धुमाकूळ घालताना दिसणार आहे. अक्षय कुमार परत एकदा राजूची भूमिका साकारेल असे दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसापासून जगभरातून मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमाखातर अक्षय कुमार हेरा फेरी 3 मध्ये परतू शकतो.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies