Type Here to Get Search Results !

संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित तरीही सुनेला जाच; तीस वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या


 पती मर्चंट नेव्हीत उच्च पदावर, सासू-सासरे ही उच्चशिक्षित मात्र तरीही सासरी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तीस वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली.

खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मीरा श्यामगर गुसाई (वय 30, रा. शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पती श्यामगार गुसाई, सासरे महेशगर गुसाई, सासू हर्षाबेन गुसाई तसेच दिर मितगर महेशगर गुसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा यांच्या आईने याबाबत तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की मीरा या मूळच्या गुजरात राज्यातील आहे. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यांचा भाऊ आणि वहिनी फॉरेनमध्ये डॉक्टर आहेत. मीरा यादेखील उच्चशिक्षित होत्या. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कॅनडा एका विद्यालयात प्रवेश देखील मिळवला होता. मात्र यावरूनच सासरी त्यांचा छळ सुरू झाला होता.

मयात मीरा यांचा पती मर्चंट नेव्हीत असून तो इतर राज्यात नेमणुकीस आहे. तर मीरा या पुण्यात सासू-सासरे आणि दिरासोबत राहत होत्या. मुलाच्या शिक्षणासाठी बाहेरून 15 लाख रुपये आणावेत यासाठी सासरी त्यांचा छळ होत होता. त्यामुळे त्यांनी सासू-सासऱ्यांपासून वेगळे होऊन दुसरेकडे राहण्यास सुरूवात केली होती. परंतु, पती तरीही फोनवरून त्यांना सतत त्रास देत होता. मीरा यांचे आई-वडिल भेटण्यासाठी कच्छवरून येथे आल्यानंतर त्यांना घरी बोलवायचे नाही म्हणत असत. तर, त्यांनी घरातून लवकर जावे, यासाठी मीरा यांना पती श्यामगर हा फोनवर त्रास देत होता.

दरम्यान, मीरा यांनी 16 लाख रुपये शिक्षणासाठी (Pune Crime) जमा केले होते. ते पैसे पतीच्या खात्यावर जमा करावे यासाठी देखील त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्या नोकरी करत असलेल्या ठिकाणी दिर पाळत ठेवत असत. पतीने कॅनडाला गेली तर मी आत्महत्या करेल अशी धमकी देखील दिली होती. पती व सासू-सासऱ्यांच्या सततच्या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे हे करत आहेत.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies