बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठीमुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण
मुंबई- आद्य पत्रकार, विचारवंत, "दर्पणकार" बाळशास्त्री जांभेकर यांची सिंधुदुर्ग ही जन्मभूमी.. या भूमीत बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक व्हावं अशी राज्यातील पत्रकारांची जुनी इच्छा होती.. युती सरकारच्या काळात पत्रकारांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास सुरूवात झाली.. मा. श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्मारकासाठी पाच कोटी रूपये राज्य सरकारने मंजूर केले.. या निधीतून बाळशास्त्री जांभेकर यांचं भव्य स्मारक उभं राहिलं आहे.. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले.. त्याचं स्मरण म्हणून राज्यात स्मारकाचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उदघाटन व्हावं अशी राज्यातील पत्रकारांची इच्छा आणि तशी विनंती आहे. स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे यासाठी आज मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बाळा खडपकर, सचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पत्र दिले.