शिव्या देताना ऐकताना मजा येतेय! चिनी माकडांची धुलाईच्या व्हिडीओवर सामान्यांची प्रतिक्रिया
पुरंदर सोशल मिडीयाDecember 14, 2022
0
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये
हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आल्यापासून देशातील
वातावरण तापले आहे. यावरून विरोधी पक्ष सरकारला घेराव घालत आहेत, चीनच्या कारवायांचे विश्लेषण देखील केले जात आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर 2.20 मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात हिंदुस्थानी सैनिक चिनी
सैनिकांची धुलाई करत आहेत. चिनी माकडांची धुलाई होत असल्याचे पाहून लोकांनी या
व्हिडिओचा आनंद घेतला आहे.