तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांनी पप्पू कुठे आहे हे शोधण्यासाठी आपल्याच अंगणात शोध घ्यावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत अर्थ मंत्रालयावर टीका करताना 'आता पप्पू कोण आहे?' अशी विचारणा केली होती.
सीतारामन
यांनी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान महुआ मोईत्रा यांच्या टीकेला
उत्तर दिलं. “सन्माननीय सदस्या महुआ मोईत्रा यांनी
पप्पू कोण आहे आणि कुठे आहे? अशी
विचारणा केली आहे. त्यांनी आपल्याच अंगणात शोध घेण्याची गरज आहे. पश्चिम
बंगालमध्ये त्यांना पप्पू सापडेल,” असं उत्तर
सीतारामन यांनी म्हटलं.
“सर्व
मॅक्रो-इकॉनॉमिक्सच्या मूलभूत गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे,” अशी टिप्पणी करत त्यांनी म्हटलं की “जेव्हा सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी चांगल्या योजना आणल्या
जातात तेव्हा पश्चिम बंगाल त्या नियंत्रि करतो आणि त्याच वितरण करत नाही.
पप्पूसाठी तुम्हाला इतर कुठे शोध घेण्याची गरज नाही”.
“याहून वाईट म्हणजे माचीस कोणाच्या हातात आहे? मला यावर जास्त भाष्य करण्याची इच्छा नाही. कदाचित त्यांना
आपल्या प्रश्नांना धार द्यायची आहे. लोकशाहीत लोक आपला नेता निवडतात. त्यांना
सत्ता कोणी दिली असे सांगून लोकांना कमी लेखू नका," असं सीतारामन म्हणाल्या.
सीतारामन
यांनी यावेळी गुजरातमधील भाजपा विजयाचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर
टीका केली. “गुजरातमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय
मिळवला असून, किती शांतपणे सरकार स्थापन होत आहे.
बंगालमधील विधानसभा निवडणूक पाहता तिथे माचीसचा वापर कसा आणि कोणी केला? हा प्रश्न आहे. आमच्या हातात माचीस होती तेव्हा आम्ही उज्ज्वला, उजाला, पंतप्रधान
शेतकरी योजना,
स्वच्छ भारत मोहीम सुरु केली.
तुमच्या हातात माचीस आली तेव्हा लूट, बलात्कार
सुरु होते,” असा आरोप त्यांनी केला.
महुआ
मोईत्रा यांनी बुधवारी आर्थिक प्रगतीच्या दाव्यांवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं
होतं. यावेळी त्यांना खासकरुन २०२२-२३ च्या अनुदानासाठी पुरवणी मागण्या म्हणून
अतिरिक्त तीन लाख कोटींसाठी संसदीय मंजुरी मिळवण्याच्या सरकारडून सुरु असलेल्या
प्रयत्नांचा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी खरे पप्पू कोण आहेत हे दिसत आहे अशी
टीका केली होती.