मुंबई : 'देशाच्या दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी महान काम केलं. त्यांनी जे काम केलं ते चांगलं होतं. आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.
महात्मा
गांधी यांचं देशाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. त्या जागी मी कधीही जाऊ शकत
नाही. गांधीजी आणि माझी तुलना कधीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासाठी आयुष्य
वाहिलं. अनेक वर्षे तुरुंगात घालवली. त्यांनी जे देशासाठी केलं त्याची तुलना इतर
कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हा दोघांची तुलना कुणीही करता कामा नये, असं राहुल गांधी म्हणालेत.
काँग्रेसच्या
एका नेत्याने भारत जोडो यात्रेतील राजस्थानच्या सभेत बोलताना गांधीजींची तुलना
राहुल गांधीशी केली. त्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले. तेव्हा त्यांनी अशी
तुलना केली जाऊ नये, असं आवाहन
केलं.