Type Here to Get Search Results !

हजार रुपयांत स्तनाचा कर्करोग बरा... टाटा मेमोरिअल रुग्णालयाकडून उपचार

 


मुंबई : स्तनांचा कर्करोग बरा करण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाने अवघ्या हजार रुपयांत औषधोपचार उपलब्ध केले आहेत.

अहवालाअंती योग आणि व्यायाम केल्याने स्तनांच्या कर्करुग्णांत मृत्युदर १५ टक्क्यांनी घटल्याचे आशादायी निरीक्षण समोर आले आहे. यामुळे दरवर्षी सुमारे चार हजार कर्करुग्णांचा जीव वाचविणे शक्य होईल.

ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या अत्यंत गंभीर प्रकारच्या स्तन कर्करोग असणाऱ्या रुग्णांमध्ये विशेषतः ५० वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांमध्ये कार्बोप्लॅटिन औषधाने कर्करोग बरा होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी, सर्व प्रकारच्या कर्करोग उपचारांत वापरात येणाऱ्या या औषधाविषयी एवढा महत्त्वाचा निर्णायक पुरावा उपलब्ध नव्हता.

परंतु, टाटा रुग्णालयात २०१० ते २०२२ या काळात नोंदणी केलेल्यांपैकी ८५० रुग्णांचा या अभ्यासात सहभाग होता. त्याचप्रमाणे, या रुग्णांनी सातत्याने दोन वर्षे योग आणि व्यायाम केल्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत झाल्याची सकारात्मक बाब दिसल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली आहे.
टाटा मेमोरिअल रुग्णालयातील या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. अमेरिका येथे आयोजित सॅन अँटेनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियम या परिषदेत टाटा रुग्णालयाच्या डॉ. नीता नायर यांनी हे संशोधन सादर केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अहवालातील वैशिष्ट्ये
n स्तनांचा कर्करोग असलेल्यांवर उपचारांबरोबरच योग आणि व्यायामामुळे आयुर्मान ६६ वरून ७४ टक्क्यांवर गेले.
n शारीरिक हालचालींना गती मिळते. भावनिक, मानसिक बुद्ध्यांकात सकारात्मक बदल.
n केमोथेरपीच्या तुलनेत दुष्परिणाम कमी.
n वेदनांचे प्रमाणही कमी, रोग प्रतिकारकशक्तीत सुधारणा.

कार्बोप्लेटिनम इंजेक्शनविषयी
n सर्व प्रकारच्या कर्करोगांत या इंजेक्शनचा वापर, स्तनांचा कर्करोग बरा करण्यात महत्त्वाचे योगदान.
n विविध औषध कंपन्यांमार्फत सहज जगभरात उपलब्धता.
n एकूण सहा महिन्यांचा उपचार कालावधी.
n प्रजनन प्रक्रियेवर परिणाम नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies