राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले आहेत.
सध्या या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा
आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला.
पुण्यात हा विवाहसोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर
व्हायरल झालेत.
अक्षय आणि हार्दिकचं हळद, संगीत, मेंहदी ते लग्नापर्यंतचे
सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अक्षयाने लग्नात लाल रंगाची नववारी साडी, कपाळावर चंद्राची कोर, नाकात नथ, आंबाडा आणि गळ्यात
साजेसा नेकलेस घातलेला पाहायला मिळाला. या लूकमध्ये वधू खूपच सुंदर दिसते आहे. तर
हार्दिकने बेज रंगाचा कुर्ता आणि त्याखाली लाल रंगाचे धोतर नेसले आहे. त्याने
गळ्यात रुद्राक्षांच्या माळांचा नेकपीस घातला आहे. तो राजेशाही अंदाजात दिसतो आहे.
त्यांच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
यानंतर अक्षयाने आणखी एक फोटो सोशल
मीडियावर शेअर केला आहे. तुझ्यात जीव रंगला. कायमचा. असं कॅप्शन तिनं या फोटोला
दिलं आहे. फोटोत दोघांच्या गळ्यात माळा दिसतायेत. फोटोत अक्षया पिवळ्या रंगाच्या
साडीत तर हार्दिक सफेद कलरच्या शेरवानीमध्ये दिसतोय. चाहत्यांनी दोघांवर
शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या
पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये पती पत्नी
झाले आहेत.