सर्वसामान्य लोकांना आधीच महागाईनं मोठा फटका बसला आहे.
त्यामध्ये RBI ने व्याजदर वाढवल्याने रेपो रेट महाग झाले. त्यामुळे लोन आणि कर्ज
महाग झालं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा
मिळण्याची शक्यता आहे. CNBC आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे.
नवा टॅक्स स्लॅब सर्वसामान्य
लोकांचा विचार करून तयार केला जात आहे. सध्या याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची
माहिती मिळाली आहे. काही नव्या सुविधा ग्राहकांना मिळणार असल्याचं समजत आहे. सरकार
आता याबाबत विचार करत असून लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या
माहितीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जाऊ शकतात. जुन्या टॅक्स व्यवस्थेत बदल
करून आता 5 लाखांपर्यंत ही मर्यादा वाढवली जाऊ शकते. 2.5 लाख रुपयांपर्यंत ज्याचं उत्पन्न
होतं त्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. आता मात्र ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येऊ
शकतो.
होम लोनच्या व्याजदरात मिळू शकते
सूट सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार सरकार गृहकर्ज व्याज आणि
स्टँडर्ड डिडक्शनसारख्या सवलतींवर चर्चा करू शकतं. करदात्यांच्या सोयीसाठी नवीन कर
परतावा फॉर्म लागू करण्यासाठी रोडमॅप जाहीर करणे शक्य होऊ शकते. यासोबतच नव्या
इन्कम टॅक्स रिटर्नअंतर्गत कॉमन फॉर्म लागू केला जाऊ शकतो. सध्या करदात्यांना
वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात.
त्यासाठी विविध श्रेणीतील
करदात्यांना ITR-1 ते ITR-6 भरावा लागतो. ITR-7 फॉर्म सरकारकडून जारी केला जाऊ शकतो. स्टेकहोल्डर्सना देखील त्यांचं
याबाबतच मत केंद्र सरकारने मागवलं आहे. 15 सप्टेंबरपर्यंत स्टेक
स्टेकहोल्डर्सना आपलं मत देता येणार आहे. त्यामुळे यावेळचं बजेट थोडं वेगळं असणार
आहे.