मुंबई : जर तुम्ही पॅन कार्ड होल्डर असाल आणि तुम्ही अजूनही जर आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर ही तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे.
जर कार्डधारक कायमस्वरूपी खाते
क्रमांक (पॅन) आधार कार्डशी जोडण्यात अपयशी ठरला तर मार्च 2023 नंतर ते बंद होईल. केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मार्च महिन्याच्या सुरुवातीला ही माहिती दिली
होती. तुमच्याकडे चार महिने आहेत. यानंतर तुमचं पॅन कार्ड बंद होईल आणि तुमच्या
अडचणी सुरू होतील. आयकर विभागाने ३० जूननंतर आधारला पॅनशी जोडल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार
आहे. विलंब शुल्क भरल्याशिवाय कोणालाही त्यांच्या पॅनला त्यांच्या आधारशी जोडण्याची
परवानगी दिली जाणार नाही. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे.
कार्डधारकांनी लिंक न केल्यास 2023 मध्ये निष्क्रिय होईपर्यंतच
त्यांना पॅन कार्ड वापरता येणार आहे. यानंतर पॅन कार्डधारकांना बँक खाती, म्युच्युअल फंड किंवा शेअर खाती
उघडण्यासारख्या गोष्टी करता येणार नाहीत. तुम्ही कुठेही दस्तऐवज म्हणून लॉक
पॅनकार्डचा वापर केल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्काचा धोका पत्करावा लागू शकतो.
आयकर कायदा 1961 च्या कलम 272 बी अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला
जाऊ शकतो. नियमानुसार 1961 नुसार, सूट दिलेल्या श्रेणीत न येणाऱ्या सर्व पॅनधारकांसाठी पॅन आधारशी लिंक
करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. पॅन आधारशी लिंक केलं नाही तर पॅन कार्ड बंद होऊ शकतं.
आधार पॅन कार्डशी लिंक कसं
करायचा? इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा क्विक लिंक सेक्शनमध्ये
जाऊन लिंक आधारवर क्लिक करा एक नवीन विंडो दिसेल, आपला आधार तपशील, पॅन आणि मोबाइल नंबर प्रविष्ट
करा 'मी माझा आधार तपशील व्हॅलिडेट करतो' हा पर्याय निवडा आपल्याला आपल्या
नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. त्यात भरा आणि 'व्हॅलिडेट'वर क्लिक करा दंड भरल्यानंतर
तुमचा पॅन तुमच्या आधारशी जोडला जाईल.