मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी येणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडून ठरलेल्या रकमेशिवाय २० ते ३० रुपये अधिक आकारले जातात.
ग्राहकांकडून जास्त पैसे स्वीकारले जात
असल्याने सर्वसामान्यांची एकप्रकारे पिळवणूकच होते. एवढेच नव्हे तर घरचे बजेटच
कोलमडत आहे, अशा वेळेस ग्राहकांनी तक्रार करून दाद मागणे आवश्यक आहे.
गगनाला भिडणाऱ्या महागाईत गॅस सिलिंडरचे
दरही मागे राहिलेले नाहीत. सिलिंडरचे दर मुंबईत सरासरी १ हजार ५० रुपये इतके असून
यावर आणखी घरपोच शुल्क २० ते २५ रुपये आकारले जाते. त्यामुळे सिलिंडर विकत घेताना
अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने ससेहोलपट होत आहे. अतिरिक्त पैसे मागत असल्यास
तक्रार केली पाहिजे. मुंबईत भारत गॅस, इंडेन गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम
(एचपी) या कंपन्यांद्वारे गॅस सेवा पुरवली जाते. त्यातही भारत गॅस आणि हिंदुस्तान
पेट्रोलियमच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. तर इंडेन गॅसची ग्राहक संख्या
त्यामानाने कमी आहे.
तक्रार कोठे करणार?
घरोघरी सिलिंडर पोहोचवणाऱ्या
कर्मचाऱ्यांना पगार असला तरी काही मजूर सिलिंडरच्या ठरलेल्या रकमेशिवाय जास्त पैसे
मागतात. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात
आले आहेत. या व्यतिरिक्त मेलद्वारेही तक्रार नोंदवता येते.
भारत गॅस १८००२२४३४४
इंडेन गॅस १८००२३३३५५५
हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी)
१८००२३३३५५५
पाइपलाइनने गॅस पुरवठा
मुंबईतील काही इमारतींमध्ये पाइपलाइनने
गॅस पुरवठा केला जातो. घरात पाइपलाइनद्वारे स्वयंपाकासाठी गॅस पुरवले जाते.
महिन्याकाठी वापरण्यात आलेल्या इंधनाचे पैसे संबंधित गृहनिर्माण संस्थेला मोजावे
लागतात.
गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्या
कर्मचाऱ्यांना पगार
घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्या
कामगारांना तत्सम गॅस एजन्सीमार्फत महिन्याकाठी पगार दिला जातो. खांद्यावरून गॅस
सिलिंडर वाहून नेण्यासारखे अवजड आणि मेहनतीचे काम असल्याने त्या तुलनेने त्यांना
पगार दिला जातो. २५ ते २८ हजारांच्या घरात हा पगार असल्याची माहिती गॅस एजन्सीच्या
कर्मचाऱ्याने दिली.