आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी नुकताच एक सुतळी बॉम्बचा फोटो शेअर करत मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे जाहीर केले होते, त्यावर आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
नागपूर
येथे हिवाळी अधिवेशन सुरू सुरू आहे. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासह संजय
राऊत हे देखील नागपूर दौऱ्यावर आहेत.
नागपूर
दौऱ्यावर असतांना सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढून
राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असून वातावरण अधिकच तापलं आहे.
हिवाळी
अधिवेशनच्या दरम्यान नागपुरात आलेल्या संजय राऊत यांनी सुतळी बॉम्बचा फोटो ट्विट
केला होता, त्यावरुन मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे
संजय राऊत यांनी म्हंटले होते.
एकूणच
सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत
असतांना आमदार रवी राणा यांनी थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील
असा इशारा दिला आहे.
संजय राऊत
यांच्या उद्धव ठाकरे यांना बक्षीस देईल असे म्हणत रवी राणा यांनी अडीच वर्षात काय
केलं असा सवाल उपस्थित केला आहे.