नागपूर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
चारही
बाजूंनी हिरवळ,
बगीचा आणि एक अद्भुत दृश्य येथे
दिसणार आहे. सेल्फ इल्युमिनेटिंग लाईट्सच्या बळावर चौक रंगही बदलेल. कधी गुलाबी, निळा, तर कधी
पिवळा, हिरवा, पांढरा आणि केशरी असे अनेक रंग डोळ्यांसमोर येतील आणि सर्वांना
मोहिनी घालतील.
हा चौक तयार करण्यासाठी १६.३७
कोटी रुपये खर्च आला आहे. येथे पामसोबतच खजुराचे लांब वृक्ष दुरूनच आकर्षित करतील.
सायकसची झाडेही आपली छटा पसरविताना दिसतील.
नागपूरजवळील
हा चौक विजेच्या खर्चाच्या बाबतीत आत्मनिर्भर राहणार आहे. त्यासाठी येथे सोलर
ट्रीचा उपयोग करण्यात आला आहे. सोलर ट्री अशी रचना आहे, ज्याला एका वृक्षासारखी डिझाईन केली आहे. त्याच्या शाखा
स्टीलच्या आहेत. त्यावर सूर्यप्रकाशापासून वीज तयार करण्यासाठी पॅनल लावण्यात आले
आहेत.