मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात भाकरी देण्याच्या नावाखाली एका उपाशी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पीडित
महिलेवर ढाब्याच्या मालकासह तिथेली कर्मचाऱ्यांनी जवळपास १२ दिवस बलात्कार केला.
पीडित महिला ढाब्यावरुन पळून जाण्याची एका संधीची वाट पाहत होती आणि ती तिला
मिळाली. संधी मिळताच पीडित महिलेला तिथून पळ काढण्यात यश मिळाले. त्यानंतर ती थेट
जवळीस पोलीस स्थानकांत तक्रार देण्यासाठी दाखल झाली.
पोलिसांनी
महिलेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करून कांचन ढाब्याच्या मालकासह स्वयंपाक
करणारा आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, NH 30 हायवेवर असलेल्या कांचन ढाब्यावर २६
वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही महिला मैहर येथील रहिवासी आहे.
तिला ढाब्यात अनेक दिवस डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं पोलिसांनी
सांगितले.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, पीडित
महिलेने मंगळवारी संधी मिळताच तिथून पळ काढला. नादान पोलीस ठाण्याचे प्रभारी
म्हणाले की, आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि ३४२
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ही
घटना सतना जिल्ह्यातील मैहर नादान देहाट पोलीस स्टेशन परिसरातील आहे.