कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावाने चांगभल या मालिकेत बाळूमामाची मुख्य भूमिका
साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे हा नुकताच लग्नबंधनात अडकलाौ आहे. सांगोला येथे
राजेशाही पद्धतीत हा लग्नसोहळा पार पडला.
अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी,
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. बाळूमामाच्या नावाने
चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.