Type Here to Get Search Results !

औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात, भरावे लागणार एवढा टोल

 


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
"> हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  समृद्धी महामार्गाचे"> समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी"> नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील विकासात आणखी एक भर पडणार असून, प्रवास सुखकर होणार आहे. दरम्यान याचा फायदा औरंगाबाद ते शिर्डी  प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होणार आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे आता औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद"> औरंगाबादआणि जालना जिल्ह्यातील"> जालना जिल्ह्यातील साई भक्तांचा प्रवास आता कमी वेळेत आणि सुखकर होणार आहे.

समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी  हा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीस खुला केला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून शिर्डी जाण्यासाठी वैजापूर व श्रीरामपूरमार्गे आदळ- आपट करीत चार तासांत शिर्डीत जाण्याच्या जाचातून भाविकांची सुटका होणार आहे. औरंगाबादच्या सावंगी इंटरचेंजपासून अवघ्या चाळीस मिनिटांत शिर्डी गाठणे शक्य होणार आहे. ज्यासाठी प्रवाशांना 170 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

असा होणार बदला...

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या सहापदरी 520 कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात होणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात हर्सूल सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव (लासूर स्टेशन) आणि जांबरगाव (वैजापूर) या ठिकाणी समृद्धी महामार्गावर इंटरचेंज असणार आहे. तर औरंगाबाद, जालना या दोन्ही जिल्ह्यातून दररोज शेकडो साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला जात असतात. सध्या जालना मार्गाने शिर्डीचे अंतर सुमारे 190 कि.मी. असून, यासाठी औरंगाबादहून श्रीरामपूर व वैजापूरमार्गे शिर्डीस जावा लागते. शिर्डीला जाण्यासाठी औरंगाबाद-वैजापूर- शिर्डी असा प्रवास करण्यासाठी सद्या चार तास लागतात. त्यात रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहनधारक हा मार्ग टाळण्याचे प्रयत्न करतात. तर दुसरीकडे औरंगाबादहून नेवासा, श्रीरामपूरमार्गे शिर्डीस जाण्यास साडेतीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो.

असा असणार टोल...

समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रति कि.मी. 1 रुपये 73 पैसे या दराने टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे औरंगाबाद ते शिर्डी हे अंतर 99 कि.मी. असून, शिर्डीला जाण्यासाठी 171 रुपये टोल द्यावा लागणार आहे. तसेच नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी 900 रुपये आणि औरंगाबाद ते नागपूर या प्रवासासाठी 700 रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागणार आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies