अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीतभारतीय क्रिकेट टीमचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा हे नाव चर्चेत होते. जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर रिवाबा जडेजा विजयी झाल्या आहेत.
रिवाबा
जाडेजा यांचा जन्म 1990 मध्ये
राजकोट येथे झाला. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या रिवाबा जाडेजा यांनी
आता राजकारणात प्रवेश झाला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना, त्या वेळी देण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, रिवाबा यांच्याकडे 57.60 लाख
रुपयांचे दागिने आहेत. 4.70 लाख
रुपयांची रोख रक्कम आहे. रिवाबा यांची एकूण 62.35 लाखांची
संपत्ती आहे. त्यांचा फूड बिझनेस असून, वार्षिक
उत्पन्न 6.20 लाख रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात
नमूद केले आहे. रिवाबा यांच्या नावावर एकही वाहन नाही. रिवाबा यांच्याकडे सुमारे
एक कोटी रुपयांचे दागिने आहे. यात सोनं, चांदी आणि
हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. एकूण 34.80 लाख
रुपयांचे सोन्याचे दागिने, 14.80 रुपयांचे
हिरे आणि आठ लाख रुपयांचे चांदीचे दागिने आहेत. रवींद्र जडेजाकडे 23.43 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
भारतीय
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचे वार्षिक उत्पन्न 16 कोटी रुपयांहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत रवींद्र जडेजाच्या
संपत्तीत सुमारे 40 टक्क्यांनी
वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या जडेजाची एकूण संपत्ती 13 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 107 कोटी रुपये आहे. गुजरातमधल्या जामनगरमध्ये रॉयल नवघन या आलिशान
बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. शिवाय, जामनगरमध्ये
आणखी तीन घरं आहेत. अहमदाबाद आणि राजकोटमध्ये लक्झरी घरं आहेत. जाडेजाला
घोडेस्वारीची आवड आहे. त्याचं आलिशान फार्म हाउस आहे.
रवींद्र
जडेजाकडे Audi
Q7, Audi A4, BMW, Rolls Royce यांसारख्या
आलिशान मोटारी आहेत. याशिवाय त्याच्याकडे बाइकदेखील आहे. 33 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता आहे. यात
शेतजमीन, कमर्शियल प्लॉट, रेसिडेन्शियल प्लॉट आणि आलिशान घरांचा समावेश आहे. त्यामुळे
गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा जडेजा
यांच्या संपत्तीची जोरदार चर्चा होती.