Type Here to Get Search Results !

सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा

 सासवड येथे ०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा




सासवड दि.३

 पुरंदर मधील सर्व दिव्यांग, विधवा, निराधार यांना ताकद देण्याचे प्रामाणिक प्रयत्न यापुढे मी करणार आहे. पिवळी शिधापत्रिकासाठी पात्र दिव्यांगांनी माझ्या संपर्क कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करावी त्यांना घरपोच पिवळी शिधापत्रिका मिळण्याची मी व्यवस्था करतो तसेच पिवळी शिधापत्रिकासाठी कोणालाही १ रु सुद्धा देऊ नका तसेच कोणीही दिव्यागांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे तसेच लवकरच पुरंदर मधील दिव्यांगाचा महा मेळावा घेण्यात येईल अशी घोषणा शिंदे गटाचे गटनेते तसेच प्रवक्ता विजय शिवतारे यांनी यावेळी केली. एमआरडी अंतर्गत असणाऱ्या ३५ गावातील दिव्यांग बांधवांनी घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केले.



          सासवड ( ता पुरंदर ) येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दादा जाधवराव सांस्कृतिक भवनामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्था प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पुरंदर यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजय शिवतारे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप यादव, डेक्कन मर्चंट सहकारी बँकेचे अध्यक्ष का.दि. मोरे, बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा महिला प्रभारी सुनिताताई कसबे, मंदार गिरमे, धीरज जगताप, अभिजीत जगताप, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे, साकेत जगताप, विजयकुमार जाधव, अमोल जगताप, काशिनाथ जगताप, फिरोज पठाण, अश्विनी गायकवाड, उर्मिला पोरे, माया खेडेकर, इमरान इनामदार, रेखा कांबळे, कांचन क्षीरसागर, देविदास कामठे, प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.



         शासकीय अधिकारी हे एखाद्या संघटनेच्या प्रतिनिधीचे करुन आमच्यावर दबाव आणत असतात. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दिव्यांगांच्या योजना या शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे व भविष्यामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी औद्योगिक सहकारी संस्था निर्माण करणार असल्याचे मत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे पुरंदर तालुका अध्यक्ष काशिनाथ जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले.

         या कार्यक्रमांचे आयोजन प्रहार संघटनेचे पुरंदर तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, काशिनाथ अण्णा जगताप, हनुमंत नेटके, अश्विनी गायकवाड इमरान इनामदार यांनी केले होते. यावेळी प्रहारचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण जगताप, प्रहारचे सचिव इम्रान इनामदार, कार्यध्यक्ष दिलीप भोसले, जेजुरी शहराध्यक्ष प्रमोद थोरात, सासवड शहराध्यक्ष लक्षण बनसोडकर, चंद्रकांत कसबे, अविनाश इभाड आदी प्रहारचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies