Type Here to Get Search Results !

आता भाऊबीजेलाही मिळणार सुटी !

 


मुंबई,

हाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया Vacation जाहीर केल्या आहेत.

बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. Vacation सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत. Vacation या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Vacation यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी (रविवार), होळी धुळवड ७ मार्च (मंगळवार), गुढीपाडवा २२ मार्च (बुधवार), रामनवमी ३० मार्च (गुरुवार), महावीर जयंती ४ एप्रिल (मंगळवार), गुड फ्रायडे ७ एप्रिल (शुक्रवार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (शुक्रवार), महाराष्ट्र दिन १ मे (सोमवार), बुद्ध पौर्णिमा ५ मे (शुक्रवार), बकरी ईद अर्थात ईद उल झुआ २८ जून (बुधवार), मोहरम २९ जुलै (शनिवार)च्या सुट्या जाहीर केल्या आहेत.

वर्षाच्या उत्तरार्धात, Vacation स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (मंगळवार). पारशी नववर्ष दिन शहेनशाही १६ ऑगस्ट (बुधवार), गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर (मंगळवार), ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर (गुरुवार), महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (सोमवार), दसरा २४ ऑक्टोबर (मंगळवार), दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर (रविवार), बलिप्रतिपदा १४ नोव्हेंबर (मंगळवार), गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर (सोमवार) आणि नाताळची २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.Vacation

राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार १५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे. Vacation

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies