Type Here to Get Search Results !

भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधानांसह दिग्गजांची उपस्थिती

  


गुजरात विधानसभेची  निवडणूक नुकतीच पार पडली.

भाजपनं 156 जागा जिंकत दणदणित विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली आहे. भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा आज, 12 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सोबतच भाजपचे अन्य राज्यांतील काही मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत  ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या बैठकीत भाजप आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता ज्याला उपस्थित आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.

निकाल हाती आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेत भाजप विधीमंडळ गटाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवण्यात आली होती.

शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती

भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संसदीय मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.भूपेंद्र पटेल हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 20 जण कॅबिनेट मंत्री म्हणूनदेखील शपथ घेण्याची शक्यता आहे.

भाजपचा ऐतिहासिक विजय

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 156 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या या विजयाने काँग्रेसचा 37 वर्ष जुना विक्रमदेखील मोडीत निघाला. काँग्रेसने 1985 च्या निवडणुकीत 149 जागांवर विजय मिळवला होता.

काँग्रेसचं विरोधीपक्ष नेते पद नाही
गुजरात विधानसभेच्या 182 जागा आहेत. विरोधीपक्ष पदासाठी कमीतकमी 10 टक्के जागा निवडून येणं अनिवार्य आहे. विरोधीपक्ष नेतेपदासाठी गुजरातमध्ये कमीतकमी 18 जागा हव्या आहेत. पण काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies