Type Here to Get Search Results !

'जयंत पाटलांच निलंबन मागे घ्या' अजित पवारांनी केली विनंती, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

 


हिवाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले. यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे.

'मागिल आठवड्यात जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. एवढी कठीण शिक्षा करणे बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला कारवाई मागे घेऊन सहभागी करुन घेण्याची विनंती केली होती. मीही शांतपणे भूमिका घेतली. अध्यक्ष महोदय तुम्हीही सामंजस्य भूमिका गेतली होती. उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही मनाचा मोठेपण दाखवून पाटील यांच्यावरील कारवाई मागे घ्याल अस मला वाटतं, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री महोदय सध्या सभागृहात उपस्थित नाहीत. ते उपस्थित झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गेल्या आठवड्यात सभागृहात दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, यावेळी दालनात विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षातील सदस्य दालनात उतरले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे. यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

'तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा'

कर्नाटक हे भारताचं राज्य आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला बंधनकारक मग कर्नाटकाला नाही का? सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा असं म्हणतात मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार? आजच सीमावाद कसा पेटला? आपल्या आदर्शाचा अपमान महाराष्ट्रातच व्हायला लागला मग इतर सोडणार कसे? आज नाही तर कधीच नाही या जिद्दीने उभं राहायला हवं. सीमाभाग केंद्रशासित झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने हाती घेऊन पालकत्व करावं असा ठराव आजच्या आजच झाला पाहिजे अशी मागणी विधान परिषदेत आमदार उद्धव ठाकरे यांनी केली.

विधान परिषदेत सीमावादावर ठराव मांडण्यात येणार असून त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सभागृहात सर्व सदस्यांचं एकमत झालं ही चांगली गोष्ट आहे. सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रात जायचंय त्यासाठी अनेक ठराव, प्रस्ताव मांडले. १९७० च्या दशकात महाराष्ट्र सरकारनं एक फिल्म बनवली होती. सीमाभागात मराठी भाषा कधीपासून अस्तित्वात आहे त्याचे पुरावे आहेत. ही फिल्म दोन्ही सभागृहातील सदस्यांना दाखवावी. जेणेकरून सीमावादाचा ठराव म्हणजे काय हे नवीन सदस्यांना कळू द्या असं त्यांनी सांगितले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies