जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रालयासाठी 1 हजार 143 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
जागतिक
दिव्यांग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात राज्यस्तरीय
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध
क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
दिव्यांगावर आधारित दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले.