मुंबई, 01 डिसेंबर : 'जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादीची स्थापन झाल्यापासून सुरू झाले' अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पण, 'बोरिंग यार, कुछ नया बोलो' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत
असताना सुप्रिया सुळे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी राज
ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर
टीका केली आहे. पण, आता हे बोरिंग झालं आहे, 'कुछ नया बोलो' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी
राज ठाकरेंना टोला लगावला.
'मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती
शिवाजी महाराज यांची तुलना मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी केली. या प्रकरणी त्यांनी
आता दिलगिरी व्यक्त केली आहे. मग महागाई असेल किंवा इतर विषयावर चर्चा करणे गरजेचे
आहे', असा टोलाही सुळे यांनी लगावला. 'समान नागरी कायदा हे संसदेत होतात, सोशल मीडियावर होत नाहीत.
जो पर्यंत संसदेत विषय येत नाही
तोपर्यंत यावर बोलण योग्य नाही, असंही सुळे म्हणाल्या. 'कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील
गावांवर दावा केला आहे. त्यांची विधानं सुरूच आहे. पण हे सरकार का करतंय हे कळत
नाही.
महाराष्ट्राच्या विरोधात वारंवार
होतंय.देशात ज्या गोष्टी होत नाही त्या इथे का होत आहे? महाराष्ट्र अस्थिर करण्याचा
प्रयत्न वारंवार होतोय. यामागे अदृश्य हात कोणाचा आहे हे माहित नाही. असा टोला
सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. 'सात्यत्याने ईडी सरकार आल्यापासून जे हिताचं नाही ते होतंय, एक दोनदा झालंय ठीक आहे पण
वारंवार होतंय हे दुर्दैवी आहे, सत्तेत असणारे लोक करत आहे, हे योग्य नाही. कर्नाटक असेल
कोवा तेलंगणा असेल यावर सरकारणे बोललं पाहिजे, असंही सुळे म्हणाल्या. 'माझ्या काल वाचनात आलं की, सीनार्मास ही कंपनी महाराष्ट्रात
पहिल्यांदा आली हे जेव्हा ऐकलं तेव्हा हसू आलं. बारामतीमध्ये 25 वर्षांपासून प्लांट आहे ओढून
ताणून केलं जातंय. ईडी सरकारला विनंती आहे की, स्वतःच्या स्वार्थासाठी
राजकारणासाठी दिल्लीला खूष करण्यासाठी वेगळे प्रयत्न करत आहे, असा टोलाही सुळे यांनी लगावला.