(Jalgaon) जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार आहे.
आज सकाळी
आठ वाजता शहरातील रिंग रोड वरील सत्यवल्लभ हॉल या ठिकाणी जळगाव जिल्हा दूध
संघाच्या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या
पत्नी मंदाताई खडसे, गिरीश
महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांची
प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं
लक्ष लागलं आहे.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच
या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर
आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण
चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन
यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह
सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे
पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकनाथ खडसे एकटे पडल्याचे दिसत असले तरी त्यांची
सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठी ही लढाई सोपी नाही. एकूणच
आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध
संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण
राज्याचं लक्ष लागलं आहे.
विजय आमचाच, महाजनांसह
खडसेंनाही विश्वास
जिल्हा दूध
संघाच्या निवडणुकीत विजय आमचाच होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त
केला आहे. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील विजयाचा दावा केला आहे. त्यामुळं
या दोघांमध्ये आता कोणाच्या बाजूनं निकाल हे आज स्पष्ट होणार आहे. जिल्हा दूध
संघाची निवडणूक आमच्यासाठी कबड्डीच आहे. मी क्रीडामंत्री असल्यानं तर दुसरीकडे
गुलाबराव पाटील माझ्यासोबत असल्यानं या स्पर्धेत विजय आमचाच होईल असा दावा मंत्री
गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे. गिरीश
महाजन हे उत्तम कबड्डी खेळत असले तरी मी अंपायर आहे असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी
केलं होते. खडसेंच्या या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार
घेतला. अंपायर वगैरे काही नाही. त्यांनी आमच्या समोर या निवडणुकीची कबड्डी खेळा
आणि जिंकून दाखवा असं आव्हान एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांनी दिले.