आपण हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे अस फळ मिळते : भालचंद्र नेमाडे
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधकांनी ५० खोकेचा सपाटा लावला आहे. शिंदे गटाविरोधात सातत्याने ५० खोके एकदम ओके असा प्रचार करताना विरोधक दिसून येतात. खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
अशातच जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी खळबळजनक विधान केले आहे, ते म्हणाले,’आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो त्याचे हे फळ आहेत.' असं ते म्हणाले आहे. जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे,
| दरम्यान, सद्यस्थितीत राजकारणात चांगल्या लोकांनी पडू नये अशी परिस्थिती झाली असू | सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का ? असा सवालही भालचंद्र नेमाडे यांनी | उपस्थित केला आहे.दहा ते पंधरा टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या | काय खावं याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावं याचा विचार करायला हवे अस त्यांनी म्हटलंय.