मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सातत्याने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी सिनेसृष्टीत चर्चेत राहिला आहे. कंपनी, साथियासारख्या शानदार सिनेमांनी विवेकच्या करिअरमध्ये जबरदस्त वळण मिळालं.
एककाळ होता
जेव्हा विवेक ओबेरॉय चॉकलेट बॉयच्या रुपानं त्याच्या चाहत्याच्या मनात अधिराज्य
करत होता. विवेकनं यशाची उंची गाठण्यापूर्वीचा काळ खूप वेदनादायी होता. बॉलिवूड
बबलसोबत केलेल्या संवादात विवेकनं आयुष्यातील त्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे
जेव्हा सर्वकाही संपलं होतं. विवेकनं काही शॉकिंग खुलासेही मुलाखतीत केले आहेत.