मुंबई - 'दृश्यम'च्या दोन्ही भागांमध्ये पोलिस अधिकारी गायतोंडेने सत्य बाहेर काढण्यासाठी विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण केली. त्यामुळे काही प्रेक्षक गायतोंडेवर खूप चिडले असून, त्याचे पडसाद अभिनेता कमलेश सावंतच्या वास्तव जीवनात उमटत आहेत.
दृश्यम २ सिनेमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद
दृश्यम या
चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून
दृश्यम २ या चित्रपटाची कथा सुरू होत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात 'दृश्यम 2' मास
सर्किट्समधून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. 'दृश्यम २' चे
दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले असून या सिक्वलमध्ये अजय देवगण विजय
साळगावकरच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर परतला आहे. आपल्या कुटुंबाच्या
प्रभावी सुरक्षेसाठी त्यानं लावलेलं डोकं कौतुकास्पद ठरत आहे. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर, इशिता दत्ता, मृणाल जाधव
आणि रजत कपूर हेही भूमिका साकारत आहेत.