पिंपरी : बाइकटॅक्सी प्रवासी वाहतुकीला महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बाइकटॅक्सी धावत आहेत. नुकताच बाइकटॅक्सीची ऑनलाइन सेवा देणाऱ्या रॅपिडो या कंपनीवरती एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
रिक्षाचालकांच्या
आंदोलनापूर्वी बाइकटॅक्सी चालवणाऱ्यांवर आरटीओकडून केवळ दंडात्मक कारवाई करून
सोडण्यात येत होते. मात्र, रिक्षाचालकांच्या
आंदोलनानंतरपुणे,
पिंपरी-चिंचवडमध्ये थेट रॅपिडो
कंपनीशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काही
जणांना पिंपरी ते पुणे प्रवास करायचा असतो. नाहीतर पुणे स्टेशन ते चांदणी चौक.
रिक्षाचालक तसेच ओला उबेर यांचे दर ठरलेले असतात. त्यामुळे एकट्या प्रवाशाने
रिक्षा किंवा ओला उबेर करणे परवडणारे नाही. त्यामुळे ओला कार आणि रिक्षापेक्षा
निम्म्या दरात सेवा देणाऱ्या बाइकटॅक्सीने (रॅपिडो) प्रवास करण्यास प्राधान्य
देतात.
बाइकटॅक्सीचे दर किलोमीटर - एक किलोमीटर सरासरी आठ रुपये
रिक्षा - पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये, पुढील प्रत्येक किलोमीटरमागे १७ रुपये
ओला-उबेर - सरासरी १० किलोमीटर रुपयांपेक्षा अधिक
मी प्रवासाला बाइकटॅक्सीला प्राधान्य देतो
एकट्याने
प्रवास करायला रिक्षा परवडत नाही. त्यात मला डेकोरेशनच्या कामासाठी सतत प्रवास
करावा लागतो. त्यामुळे रॅपिडोच्या बाइकटॅक्सीचे दर कमी असल्याने मी प्रवासाला
बाइकटॅक्सीला प्राधान्य देतो. मी खडकी ते महर्षीनगर हा प्रवास अवघ्या ११०
रुपयांमध्ये केला. - प्रसनजीत भौमिक, रॅपिडो
प्रवासी
...तर संबंधित
पोलिस यंत्रणा त्यावर कारवाई करते
ऑनलाइन
माध्यमांमध्ये काही अपवाद वगळता ॲप बेकायदेशीर आहे की नाही, याची व्यवस्था नाही. मात्र, त्या ॲपवरून बेकायदेशीर कृत्य केले जात असेल तर संबंधित पोलिस
यंत्रणा त्यावर कारवाई करते. - संजय तुंगार, वरिष्ठ
पोलिस निरीक्षक,
एका ठिकाणी काम करून दुपारनंतर बाइकटॅक्सी चालवतो
बाइकटॅक्सी
बेकायदेशीर आहे,
याविषयी मला माहीत नाही. मात्र, बाइकटॅक्सीमुळे मला जे भाडे होते त्यातील ८० टक्के रक्कम
मिळते. २० टक्के कंपनी घेते. त्यामुळे मी सकाळी एका ठिकाणी काम करून दुपारनंतर
बाइकटॅक्सी चालवतो. - बाइकटॅक्सीचालक