Crime News : उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत.
काही
दिवसांआधी गोंडा ढांठौली गावातील सुनीता वृंदावनच्या एका भागवताचार्यासोबत
एसएसपीला भेटली होती. तिने सांगितलं की, तिच्या
निर्दोष मुलाला गावातील एका तरूणीच्या अपहरण आणि हत्येसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं
आहे. पण मुळात ती तरूणी जिवंत आहे. इतकंच नाही तर ती तिचा पती आणि दोन मुलांसोबत
आरामात जगत आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई करत तरूणीला अटक केली.
पोलिसांनी
सांगितलं की,
7 फेब्रुवारी 2015 ला 10व्या
वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.
याप्रकरणी गावातील विधवा अनीताचा एकुलता एक मुलगा विष्णुवर संशय व्यक्त केला जात
होता. अनेक महिने शोध घेऊनही तरूणी कुठेच सापडली नाही. तेच आग्रा येथे एका तरूणीचा
मृतदेह आढळून आला होता. तिच्या अंगावरील कपड्यांच्या आधारावर तिच्या वडिलांनी ती
आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं आणि विष्णुवर हत्येचा आरोप लावला. पोलिसांनी
विष्णुवर या मुलीला फसवूण नेल्याच्या आणि हत्या करून पुरावे मिटवण्याच्या
गुन्ह्याखाली 25
सप्टेंबर 2015 ला अटक केली.
काही
दिवसांनी विष्णु जामीनावर बाहेर आला. पण केसच्या ट्रायलमुळे त्याला पुन्हा
तुरूंगात जावं लागलं. या दरम्यान विष्णुच्या कुटुंबियांनी बेपत्ता तरूणीचा शोध
घेणं सुरू केलं आणि त्यांना ती जिवंत असल्याचं समजलं. आरोप आहे की, प्रकरण दाबण्यासाठी मुलीचे कुटुंबिय अनीतावर दबाव टाकत होते.
विष्णुच्या आईच्या मागणीनंतर तरूणीला अटक झाली आणि तिला कोर्टात हजर करण्यात आलं.
विष्णुची
आई अनीताचा आरोप आहे की, तिच्या
मुलाला फसवण्यात आलं आहे. त्याच्यावर आरोप आहे की, गोंडा येथे राहणाऱ्या मुलीला सात वर्षाआधी अपहरण करून आग्रा येथे
तिची हत्या केली होती. अनीता म्हणाली की, माझ्या
मुलाला फसवण्यात आलं आहे. आता कोर्टाने यावर निर्णय घ्यावा. पोलिसांनी सांगितलं की, पोलीस सत्य समोर आणण्यास तयार आहे.