ओल्ड कात्रज रोडच्या डांबरी पृष्ठभागाला बळकटी देण्याचे काम चालू असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जुन्या कात्रज घाटातून साताराहून पुणे येथे येणारी वाहतूक 31 डिसेंबरपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे ते
सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु आहे. सातारा ते पुणे जुन्या कात्रज
घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे
पुण्याकडे वळविण्यात आली आहे.