बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं तर, काही सेलिब्रिटींनी नव्या आयुष्याला सुरूवात केली.
झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत
असताना अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार
असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान सुनीलनेच लेकीच्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे.
सुनील शेट्टीने नुकत्याच प्रदर्शित
झालेल्या 'धारावी बँक' या वेब शोच्या लॉन्च कार्यक्रमादरम्यान पापाराझींशी संवाद साधला आणि
लेकीच्या लग्नाबद्दल मोठी बातमी दिली. क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टीला डेट
करत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या
लग्नाबद्दल विचारलं असता, सुनील शेट्टी म्हणाला, 'लवकरच होईल...' पण त्याने वर्ष किंवा
महिना सांगितला नाही. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर सुनिल शेट्टीची मुलगी अथिया
शेट्टी विवाह बंधनात अडकणारअसल्याची चर्चा रंगत आहे.
क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया
शेट्टीला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे दोघे
लग्न कधी करणार असा प्रश्न चाहते सतत दोघांना विचारत आहेत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन
वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि
केएल राहुल पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर
येत आहे. पण लग्न कधी होईल यावर दोघांच्या कुटुंबाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
म्हणून अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबद्दल ज्या चर्चा रंगत आहेत, त्यामधील सत्य येत्या
काळातचं समोर येईल.