Type Here to Get Search Results !

SSC HSC Exam: होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल

 


SSC HSC Exam: आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला असून, औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. कारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती, विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय.एस.दाभाडे यांनी सांगितले.

यापुढे असा बदल...

·         2023 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.

·         यंदा होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही.

·         तसेच 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही.

·         60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

·         यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता)

·         मात्र, दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.

यामुळे दिली होती सवलत...

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. ज्यात परीक्षेत होम सेंटर देण्याचा निर्णय घेतला गेला होता. तर सोबतच 80 गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास देखील देण्यात आला होता. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने आगामी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी वरील निर्णय रद्द करण्यात आले आहे.दहावी-बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूआहे. ज्यात बारावीचे अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत एक लाख 48 हजार 636 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर दहावीसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून आत्तापर्यंत 95 हजार 682 विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

होम सेंटरमुळे 'कॉपी'चे प्रमाण वाढले...

कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन दहावी-बारावी परीक्षेसाठी गेल्यावर्षी होम सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी परीक्षेत 'कॉपी'चे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी देखील योग्य व्यवस्था नसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे औरंगाबादच्या ग्रामीण भागातील एका शाळेत चक्क शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या पुरवल्या जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याची दखल घेत शिक्षण मंत्र्यांनी संबधीत शाळेची मान्यता रद्द केली होती.

 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies