मुंबई, 17 नोव्हेंबर : मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी नाईकची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी केली जाते. तिला मराठीतील ऐश्वर्या राय म्हटलं जातं.
मानसी कायमच आपल्या अभिनयानं
सगळ्यांची मनं जिंकत असते. अभिनयासोबतच मानसी नृत्य आणि स्टेज परफॉर्मन्सही करते.
गेल्या काही दिवसांपासून मानसी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेरामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं समोर आलंय.
या चर्चांदरम्यान मानसीची नवी
पोस्ट सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्रामवर
एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानसीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले असून
सोबतच एक कविताही शेअर केली आहे. तिच्या फोटोंनी आणि कवितेने सध्या इंटरेटवर
धुमाकूळ घातलेला पहायला मिळत आहे.
मानसीने शेअर केलेली कविता - देवासमोर उभा होतो, हताश मी हात जोडून.. डोळ्यामध्ये
पाणी होते, मनातून पूर्ण मोडून.. "देवा !" मी म्हणालो, "काय करू कळत नाही"...
"प्रश्नाच उत्तर मिळत नाही" "विश्वास ठेव" देव म्हणाला..
"देवा सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे
दिवे मंद आहेत" "विश्वास ठेव" देव म्हणाला.. "देवा आज असं
वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही तर कशावर
मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा ? " शांतपणे हसत देव मला म्हणाला
"पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर"
"मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म
घेण्यावर" "बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर"
"उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो, विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर" "आज
माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन, विश्वास आहे तुझा कारण मी हाक
ऐकण्यावर" "असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका
क्षणात" "आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही उद्याच
चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही" "जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे"
"तुझ्या बुद्धीच्यापलीकडेही बऱ्याच गोष्टीघडत असतात आशेचे तुटलेले धागे
तुझ्या नकळत जोडत असतात" "तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल"
"म्हणून....सगळे रस्ते बंद होतील तेंव्हा फक्त 'विश्वास ठेव' जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो देव..!!! दरम्यान, अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा
नवरा प्रदीप खरेरा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात.
मात्र गेल्या काही दिवसांपासून
मानसी आणि प्रदिपमध्ये खटके उडाले असल्याच्या चर्चा आहेत. मानसी नाईकने आपल्या
सोशल मीडियावरून नवऱ्यासोबतचे सगळे फोटो हटवले आहेत. त्याचसोबत तिने खरेरा हे
आडनाव देखील हटवलं आहे. त्यामुळेच या दोघांत सगळं काही आलबेल नाही असं चाहते म्हणत
आहेत. अद्याप दोघांनीही यावर अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.