Pune : सहायक कक्ष अधिकारी (PSI) संवर्गाच्या शंभर पदांसाठी, तर कर निरीक्षक (STI) संवर्गासाठी ६०९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही संवर्गांची जाहीर करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
खेळाडू
प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी
तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता
ग्राह्य धरण्यात आला आहे. तसेच तात्पुरती निवड यादी विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील न्यायनिर्णयाच्या अधीन
राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ऑनलाइन
पद्धतीने सादर करण्यासाठी २४ ते ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आल्याची माहिती
एमपीएससीने दिली.
पोलीस
उपनिरीक्षक पदासाठीच्या प्रक्रियेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा
निकालही जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील अर्हताधारक उमेदवारांची यादी आणि
गुणांची सीमारेषाही एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. तसेच
कागदपत्रांच्या तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही
टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही
एमपीएससीने स्पष्ट केले.