पुणे : | बोपदेव घाट परिसरात लुटमार करुन दहशत माजविणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सनी भरत जाधव याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
कोंढवा
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सनी भरत जाधव (वय-22 रा.
खंडोबानगर, सासवड, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव
आहे.आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता
स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सनी जाधव
हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सासवड
आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार या
सारख्या हत्यारांह फिरताना दरोडा ,मृत्यू किंवा जबरी दुखापत, जबरी चोरी, खंडणी , दंगा, बेकायदा
हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मागील 5 वर्षात 7 गंभीर
गुन्हे दाखल आहेत.
आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे
या भागातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.
प्राप्त
झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
सनी जाधव
याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत
एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक सरदार पाटील ,
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ
पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे
यांनी ही कामगिरी केली.