मुंबई, 15 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टआणि अ भिनेता रणबीर कपूररविवारी 6 नोव्हेंबर रोजी आई-बाबा झाले.
आलियाने एक गोंडस मुलीला जन्म
दिला. आई-वडिल झाल्यापासून आलिया रणबीरला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळत आहेत.
दोघेही सध्या त्यांच्या आयुष्यातील नव्या टप्प्याचा आनंद घेत आहेत. सध्या
बी-टाऊनमधील नवीन आई आलिया चांगलीच चर्चेत आहे.
तिच्या बारीक गोष्टींकडे
चाहत्यांचे लक्ष आहे. नुकतंच आलियाने एक पोस्ट शेअर केली असून काही काळातच ती
पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकत्याच आई झालेल्या आलिया भट्टने तिच्या
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बाळाच्या जन्मानंतर, आलियाने तिच्या सोशल मीडिया
हँडलवर तिचा पहिला-वहिला फोटो शेअर केलाय.
हातात एक कॉफीचा कप दाखवत
आलियाने फोटो शेअर केला आहे. या कपवर 'ममा' लिहिलेलं दिसत आहे. आलियाने खूप
दिवसांनंतर फोटो शेअर केल्यानं चाहते तिच्या पोस्टवर भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा
वर्षाव करत आहेत. हेही
आलियाच्या फोटोवर अनेक
प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने तिला सर्वात सुंदर "ममा" म्हटले.
दुसर्या वापरकर्त्याने 'बेबी ममा' आशा आहे की तू निरोगी आणि आनंदी आहेस ना?." तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, "कृपया आम्हाला बेबी पिक्चर दाखवा, आम्हाला बाळाला पहायचे
आहे". आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून आई आलियाला तिच्या
प्रकृतीविषयी आणि बाळाविषयी विचारपूस करत आहेत.
दरम्यान, आलिया आई बनल्यापासून सोशल
मीडियावर एकच चर्चा पहायला मिळतेय ती कपूर कुटुंबियांची. भट्ट आणि कपूर कुटुंबीय
नातीच्या आगमनाने भारावून गेले आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडकरांनी आलिया-रणबीरला
भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया आणि रणबीर बेबी गर्लचं नाव काय ठेवणार याकडे
सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच
रॉकी और राणी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच
हॉलिवूड पदार्पणही करणर आहे. हार्ट ऑफ स्टोनमधून ती हॉलिवूडमध्ये अभिनयाची जादू दाखवायला
सज्ज झाली आहे.