गुगल हे प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. बहुतांश लोक काही माहिती शोधण्यासाठी याचा वापर करत असतात. गुगल सर्चवर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती शोधता येते. जेवण बनवण्यापासून ताज्या बातम्यांपर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळतात.
चुकूनही चाईल्स पॉर्नोग्राफी गुगलवर सर्च करू नका. भारतात चाईल्स पॉर्नोग्राफीसाठी कठोर कायदे
आहेत. भारतात पॉक्सो ॲक्ट 2012 च्या कलम 14 अंतर्गत चाईल्ड पॉर्न पाहणं, तयार करणं आणि
आपल्याकडे बाळगणं गुन्ह्यांतर्गत येतं. यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवा खावा लागू
शकते.
बॉम्ब तयार करण्याची पद्धतही गुगलवर चुकूनही सर्च करू नका. अनेक उत्सुकतेपोटी लोकं हे सर्च
करतात आणि त्यानंतर त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. हे सर्च केल्यानं तुम्ही सुरक्षा
यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. बॉम्ब तयार करण्याची पद्धत सर्च केल्यानं तुमच्यावर कायदेशीर
कारवाईही होऊ शकते.
अनेकदा लोक पायरेटेड चित्रपट गुगलवरून डाऊनलोड करतात. परंतु असं करणंही गुन्ह्यांतर्गत येतं. असं
करणाऱ्या युझरवर
कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते. असं करण्यापासूनही वाचलं पाहिजे.
गुगल सर्चवरून कस्टमर केअरचा नंबर कधीही शोधू नका. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते.
अनेकदा फसवणूक करणारे लोक बनावट क्रमांक लिस्ट करतात. गुगल सर्च इंजिन टूलच्या माध्यमातून
ते रिझल्ट वर दाखवतं. जेव्हा तुम्ही त्या नंबरवर फोन करता तेव्हा तुमचा फोन त्या लोकांकडे लागतो
आणि तुमची
फसवणूक होऊ शकते.