पुणे - पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात.
शुक्रवारी रात्री लोहगावात दोन
ठिकाणी गोळीबार करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण भाई
असल्याचे सांगत एका टोळक्याने हे कृत्य केले.
नितीन सकट (२१) आणि गणेश राखपाखरे
(२१, दोघे रा. राखपाखरे वस्ती, लोहगाव, पुणे) व
त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध दहशत पसरवणे आणि आर्म अॅक्टनूसार विमानतळ पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांच्यावर अगोदर कोणतेही गुन्हे
दाखल नाहीत. शुक्रवारी रात्री ते दारु पिले. त्यानंतर संत तुकाराम चौकात सकटने
पिस्तूलातून हवेत २ गोळ्या झाडल्या.
दरम्यान, यापूर्वी मार्केट यार्डातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या
कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची
घटना घडली होती. गोळीबारामुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट उडाली.
साडेबाराच्या सुमारास ताेंड
बांधून चोरटे कार्यालयात शिरले. त्यांनी कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना
पिस्तुलाचा धाक दाखवत गाेळीबार करून कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटली.
पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस
असे अनेक भाई तयार होत असून, भर चौकात
धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत.