गांधीनगर :राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने पक्षाला रामराम केला आहे. या आमदाराने प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
यानंतर या आमदाराने समाजवादी पार्टीत प्रवेश
केला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच चर्च सुरु झाली आहे. कंधाल जडेजा असं
या आमदाराचं नाव आहे. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारल्याने जडेजा यांनी पक्ष
सोडण्याचा निर्णय घेतलाजडेजा हे गुजरातमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर
जडेजा यांनी सपाकडून कुटियाना या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जडेजा
हे 2012 आणि 2017 अशा एकूण 2 वेळा एनसीपीकडून कुटियानातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र ही जागा
यंदा काँग्रेसच्या वाट्याला गेली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढत
आहे.
गुजरातमध्ये एकूण 2 टप्प्यात निवडणुका
पार पडणार आहे. एकूण 182 मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी1 डिसेंबरला मतदान
होणार आहे. कुटियानामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत या
निवडणुकीआधीच आघाडी केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी उमरेठ, नरोदा आणि देवगड
बारिया या 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे.