नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृहखातं आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार समोर आलाय.
एका आरोपीला पोलीस वाहनातून घेऊन जात
असतानाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओ पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने केलेलं
धक्कादायक वक्तव्य सध्या चर्चेत आलंय. या व्हिडीओ आरोपी, 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' असं म्हणाला होता. या
आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या प्रकाराने पोलिसांवरही अनेक सवाल
उपस्थित केलेत. नेमका हा आरोपी कोण आहे, आणि त्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं
होतं, हे देखील आता समोर आलंय.
नागपूरात गुंडांचं धाडस वाढतंय का? असा प्रश्न उपस्थित
होतोय. त्याला कारण आहे, गुंडाने तयार केलेल्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिपचं. या गुंडाने चक्क
पोलीस वाहनात एक व्हिडिओ शूट केला. त्यात – 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल' असं तो म्हणताना
दिसला होता. म्हणतोय. हे एक प्रकारे पोलिसांनाच चॅलेंज केल्यासारखं असल्याची चर्चा
रंगलीय.
व्हिडीओ काढलेल्या या आरोपीचं नाव अच्छी
इंदूरकर असल्याचं समोर आलंय. एका खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.
सध्या तो पोलीस कोठडीत असल्याची माहिती समोर आलीय.
हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर
आरोपीला न्यायालयात नेण्यात येत होतं. त्यावेळी पोलीस वाहनात नेत असताना आरोपीचे
दोन साथीदार पोलीस वाहनाबाहेर आले. त्यांनीच हा व्हिडिओ तयार केला होता.
विशेष म्हणजे त्यावेळी व्हॅनमध्ये
पोलीसही बसलेले होते. त्याला ‘खर्रा हवा का’ असंही त्याचे सहकारी विचारतात. यावर तो ‘सर्व आहे’ असं म्हणतो.
पोलिसांसमोर व्हिडिओ तयार करणे आणि
पोलिसांना चॅलेंज करणे म्हणजे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न विचारला
जातोय. पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मेंढे
यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं
ठरणार आहे. दरम्यान, हा व्हिडीओ मात्र वेगाने सोशल मीडियात शेअर होऊ लागलाय.