बॉलिवूड स्टार आमिर खान नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. कारण त्याने दिलेल्या अनेक हिट चित्रपटांना आजही त्याचे चाहते विसरलेले नाही.
आमिरने आपण
हा निर्णय घेतल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केले. त्याने म्हंटले की, पुढील दीड वर्ष तरी आपण अभिनय करणार नसून त्यातून ब्रेक घेणार
आहोत. जवळपास 18
महिने रुपेरी पडद्यापासून लांब
राहणार असून या दिवसांत आपण घरातील कुटूंबियांना वेळ देणार आहोत.
"जेव्हा मी
अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा
त्या कामात मी पूर्णपणे व्यस्त होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरे काहीच उरत नाही.
याच कारणामुळे मी आता चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या
कुटुंबीयांसोबत राहायच असून मला माझी आई, माझ्या
मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या 35 वर्षांपासून
मी फक्त कामच करतोय. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देतोय आणि जे लोक माझ्या
जवळचे आहेत, त्यांच्यासाठी ही बाब योग्य नाही", असे आमिरने म्हंटले.
ब्रेक घेतल्यानंतर करणार 'हे' काम
आमिर खानने
आपण चित्रपटांमध्ये अभिनय न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्याने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी निर्माता म्हणून तो
त्याचे काम सुरूच ठेवणार आहे. "पुढील दीड वर्ष मी एक अभिनेता म्हणून नाही तर
एक निर्माता म्हणून काम करणार आहे," असे आमिरने
स्पष्ट केले असून आगामी 'चॅम्पियन्स' या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे आमिरने सांगितले.