Type Here to Get Search Results !

भीषण कार अपघातात गटविकास अधिकाऱ्यावर काळाचा घाला


 ळगाव : भोणे फाट्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये गटविकास अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कारने नाशिककडे जात असतेवेळी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्यावर काळानं घाला घातला. एकनाथ चौधरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता.

एकनाथ चौधरी हे सरकारी कामासाठी नाशिककडे जाण्यासाठी निघाले होते. वाटेत धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्यावर त्यांची कार अपघातग्रस्त झाली. कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एकनाथ चौधरी यांचा मृत्यू झाला.

एकनाथ चौधरी हे अमळनेर येथे गटविकास अधिकारी पदावर कार्यरत होते. तसंच यावल येथील गटविकास अधिकारी म्हणून ही त्यांच्याकडे पदभार होता. मात्र पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकनाथ चौधरी यांचा जागीच जीव गेला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केलं.

या अपघाताची पोलिसांनीही नोंद घेतली आहे. दरम्यान, एकनाथ चौथरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. MH 19 DV 4199 या महिंद्रा XUV 300 कारने एकनाथ चौधरी हे नाशिकच्या दिशेने निघाले होते. पण वाटेत त्यांची कार डाव्या बाजूने जोरात ट्रकला धडकली.

ही धडक इतकी जबर होती की, कारचा डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे चेपला. तसंच समोरची काचही फुटली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरुन अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली. या अपघातामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies