Type Here to Get Search Results !

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन.

 रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन.

     


    रायगड दि.९


         रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी मार्गाने या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई - गोवा महामार्गावरील कोलाड येथे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

 


      रायगड जिल्ह्यातील पत्रकार चौपदरीकरणच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले असून यावेळी रास्ता वाहतुकीला कोणताही स्वरूपाचा अडथळा निर्माण न करता हे आंदोलन करण्यात आले. मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन १२ वर्षे झाली, मात्र अद्याप हे काम रखडलेले आहे. ते काम कधी पुर्ण होईल याचा पत्ताच नाही.

 

 या मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असून परिणामी होणाऱ्या अपघातांमुळे शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर हजारो प्रवासी त्यामध्ये जखमी झाले आहेत. मागील ९ महिन्यात रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले आहेत. 

 


मुंबई गोवा महामार्गावर सरकार अजून किती रक्ताचे सडे आणि मृत्यूंचा तांडव पाहणार आहे. 


१२ वर्षे झाली ना चौपदरीकरण झाले, ना रस्त्यावरील खड्डे भरले गेले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी या मार्गाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सरकारमध्ये असले की या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे आणि सत्तेबाहेर आले की रस्त्यासाठी आवाज उठवायचे. या पलीकडे राजकिय पक्षांनी काहीही केले नसल्याची रायगड मधील जनतेची भावना आहे. 


निर्दयी सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असल्याने जनतेच्या मनात रोष आहे. 

यावेळी रायगडमधील विविध सामाजिक संघटना, संस्था, शेकडो पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies