मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
यासोबतच अरबाज खान याचा मुलगा अरहान खान
देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी इब्राहिम अली खानच्या
डेब्यू चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार
असून फक्त इब्राहिम अली खानलाच नाही तर बोमन इराणीच्या मुलाचीही मदत करण जोहर
करणार आहे.
अशी एक
चर्चा आहे की,
इब्राहिम अली खानचा हा चित्रपट
संरक्षण दलावर आधारित आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बिग बजेटचा आहे. 2023 मध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान आणि
अरबाजचा मुलगा अरहान खानला करण जोहर लाॅन्च करणार असल्याची चर्चा आहे.
इब्राहिम
अली खान करण जोहरच्या आगामी चित्रपट रॉकी आैर राणी की प्रेम कहानीमध्ये सहाय्यक
म्हणून काम करत होता. आलिया भट्ट, रणवीर सिंह, शबाना आझमी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत.
सोशल
मीडियावर जेंव्हापासून ही बातमी कळाली आहे की, करण जोहर सैफ अली खानच्या मुलाला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार आहे, तेंव्हापासून परत एकदा करण जोहरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास
सुरूवात करण्यात आलीये. गॉड ऑफ नेपोटिझम म्हणत करणला ट्रोल केले जात आहे.