Maharashtra Mumbai News : डायबिटीज् (Diabetes) आणि ब्लडप्रेशर (High Blood Pressure) या आजारांनी संपूर्ण जगाला विळखा दिला आहे.
पण यासंदर्भातील धक्कादाय बाब म्हणजे, आता लहान
मुलांमध्येही मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवत असल्याचं पाहायला
मिळत आहे. याचसंदर्भातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या
शाळांमधील एक दोन नव्हे, तब्बल 13 हजार मुलांना डायबेटीस आणि ब्लडप्रेशर असल्याचं धक्कादायक वास्तव
समोर आलं आहे.
धकाधकीचं जीवन आणि बदललेली जीवनशैली
यांमुळे आपल्यापैकी बरेचजण आरोग्याच्या विविध समस्यांनी त्रासलेले आहेत. त्यापैकी
मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दुखणी तर अनेकांना आयुष्यभरासाठी जडली आहेत. पण
प्रामुख्यानं वयाच्या चाळीशीत जडणारे आजार आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहेत.
घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत लाखो मुंबईकर डायबिटीज, ब्लडप्रेशरने
त्रासलेले असताना आता मुंबईतील लहान मुलंही या आजारांच्या विळख्यात अडकत चालली
आहेत.
मुंबई महापालिकेतर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली जाते. याच उपक्रमातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिका शाळांतील 8 हजार 158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब, तर 5 हजार 328 विद्यार्थ्यांना मधुमेह असल्याचं पालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या तपासणी अहवाल समोर आलं आहे.
मुंबई महापालिकेनं कशी केली
तपासणी :
·
रक्तदाबसाठी 2 लाख 82 हजार 919 विद्यार्थ्यांची
तपासणी केली होती. यामध्ये 8 हजार 158 विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलं.
·
मधुमेहासाठी एकूण 2 लाख 71 हजार 583 हजार विद्यार्थ्यांची
तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 5 हजार 328 विद्यार्थ्यांना मधुमेह असल्याचं समोर
आलं आहे.